कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांना जेवणाचा डबा देणारा बाळा भोसले...
आपल्याच गावातील गडहिंग्लज मध्ये कोरोना उपचारासाठी दाखल झालेल्या कोरोनाबाधीत रुग्ण आणि नातेवाईकांना जेवण कोण देणार हा प्रश्न मला पडला. हा आजारच असा आहे की, संसर्गाचा धोका अधिक मग आपल्या गावात असलेल्या कोरोनाबाधितांना जेवण देण्याचे काम गडहिंग्लजमध्ये नव्याने सुरु केलेल्या ताव फॅमिली रेस्टॉरंटचे मालक बाळा भोसले (गाव महागोंड) करत आहेत.
कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे. यात कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच माझा गाव सापडला असे बाळा भोसले सांगत होते. या लाटेत मात्र अनेकांना जीव गमवावा लागला. अगदी जवळची माणसे सोडून गेली. काहींचं संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित झालं. त्यांच्या घरी डबे करायला कोणी नाही. अशा माझ्या गावातील रुग्ण व त्याच्या सोबत राहणार्याला जेवण देण्याचा निर्णय घेतला. गडहिंग्लज मध्ये मी हॉटेल नव्याने चालू केले, केवळ २० दिवसच हॉटेल चालू राहिले. लॉकडाउन झाले आणि हॉटेल बंद ठेवावे लागले. ही अडचण असली तरी रुग्णांची सेवा करायची आहे म्हणून मी निर्णय घेतला. गावात कोरोना झालेल्या आणि गडहिंग्लजला उपचाराला आल्यावर चौघांना जीव गमवावा लागला मात्र अनेक बरे होवून घरी गेले याचे समाधान आहे.
या महामारीत अनेकांचे जेवणाचे हाल होत आहेत. माझ्या गावातील कोणी जेवनावाचून राहू नये, त्यांना मदत करायला हवी माझे पार्टनर संदीप याबाबत चर्चा केली त्याने देखील लगेच होकार दिला. मग आम्ही ही सेवा सुरु केली. हे काम सुरू करण्यामागे एकच भावना होती ती म्हणजे माझ्या माणसांचे हाल व्हायला नको. दोन घास देण्यासाठी माझ्याकडून जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत हे मी करत राहील. असेही बाळा भोसले सांगतात. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून त्यांनी याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहचवली. अनेकजण पैसे घेण्याचा आग्रह करतात पण मी घेत नाहीत. आपल्याला सेवा करण्याची गरज आहे. गरजूला मदत करता येत असल्याचे समाधान असेही सांगतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा