कुलगुरु सर आणि मी..
सर.. नमस्कार... पवन बोला... काय गावाकडे आलाय का? नाही सर सहज कॉल केला. असे म्हणून गप्पांना सुरुवात व्हायची.. संजय देशमुख यांना पायउतार व्हावे लागल्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दयानंद शिंदे यांच्याकडे मुंबई विद्यापीठाचा कारभार राज्यपाल महोदयांनी सोपवला होता. परीक्षा व निकाल सारे गोंधळाचे वातावरण त्या काळात होते. याच काळात डॉ. शिंदे यांच्याकडे मुंबई विद्यापीठाचा डोलारा सांभायला दिला. तो त्यांनी यशस्वीपणे सांभाळला देखील. त्याच काळात सरांची ओळख झाली. मुंबई विद्यापीठात मी एकदाच भेटलो. तीच भेट त्यांनी कायम ठेवली. मध्यतरी मी गावी कोल्हापूरला गेल्यानंतरही त्यांना शिवाजी विद्यापीठात भेटायला गेलो. समोर टेबलावर काम होते. तरीही खूप गप्पा मारल्या. मी कोल्हापूरचा आणि ते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु त्यामुळे की काय सर नेहमी जवळचे वाटले.
भेटीत त्यांना मी सर मी याच विद्यापीठाचा विद्यार्थी. बीएचे प्रमाणपत्र २००३ मध्ये प्रमाणपत्र घ्यायला विद्यापीठात आलो होतो. त्यावेळी मला दिवस लागला होता.. सगळीकडे चकरा माराव्या लागल्या होत्या. आता याच विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या दालनात मला येवून गप्पा मारता येतील. असे वाटले नव्हते.. त्यावेळी सर हसले होते. शासनाचे उच्च शिक्षण विभागातील काही निर्णय किचकट वाटल्यास मी सरांना विचारत होतो. सर अगदी मनमोकळ्या पणाने समजावून सांगायचे.. मला सरांनी खूप बातम्या दिल्या.. त्या छापल्या पण त्यांनी नावासाठी कधीच आग्रह केला नाही. किंवा ते मला सांगताना माझे नाव टाकत नसलास तर मी सांगतो असे ते बोलायचे.. पुढारीच्या कोल्हापूर ऑफीस मधून त्यांना कॉल गेला की ते आताच पवनचा कॉल येवून गेला असे सांगायचे. सरांचा शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरु पदावरुन कार्यकाळ संपला. पण मार्गदर्शक म्हणून संपर्क असेलच. सरांना मी एसएमएस केला. सर पाच वर्षे लवकर संपली. म्हणताच पवन आपण काम करत राहायचे दिवस कधी थांबत नाहीत.. ते आपले काम करतात आपण आपले काम करायचे असा सल्ला त्यांनी मला दिला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा